महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भाजपला 'एक देश - एक निवडणूक' नव्हे तर ' एक देश- एक पक्ष' हवाय - चोडणकर

आघाडीत असणाऱ्या घटकपक्षांवरील अविश्वासामुळेच भाजपने काँग्रेस आमदार फोडले असल्याचे वक्तव्य गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले. एकत्र असलेल्या विरोधी पक्षाच्या भीतीने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अधिवेशनाच्या तोंडावर हे अनैतिकतेचे राजकारण केल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.

गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर

By

Published : Jul 11, 2019, 8:48 AM IST

पणजी - आघाडीत असणाऱ्या घटकपक्षांवरील अविश्वासामुळेच भाजपने काँग्रेस आमदार फोडले असल्याचे वक्तव्य गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले. एकत्र असलेल्या विरोधी पक्षाच्या भीतीने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अधिवेशनाच्या तोंडावर हे अनैतिकतेचे राजकारण केल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. तसेच भाजपला 'एक देश - एक निवडणूक' नव्हे तर ' एक देश- एक पक्ष' हवा असल्याचेही ते म्हणाले.

बुधवारी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्यासह 9 काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर चोडणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे भाजपच्या राजकारणावर टीका केली. ब्लँकमेलिंगसारख्या दबावतंत्राचा अवलंब करून भाजपने काँग्रेसचे 10 आमदार फोडले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतरचा हा नवा भारत आहे. सत्ताधारी पक्षातही काही आमदार नाराज आहेत. त्यामुळे सरकारला धोका होऊ नये, यासाठी भाजपने सत्तेचा दुरूपयोग करत हे क्रूत्य केले आहे. 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकांनी दिलेला कौल झिडकारून भाजपशी हात मिळवणी करत सत्ता प्राप्त करणाऱ्या घटक पक्षांना हा इशारा असल्याचे, असे चोडणकर यांनी म्हटले आहे.

काँग्रेसने सर्वसामान्य जनतेमध्ये जात भाजपच्या क्रुत्यांचा उलगडा करण्याची हीच वेळ आहे. लोकशाहीच्या थट्टेचा सुरू असलेला हा नंगानाच लोक पाहत आहेत. त्यांना 'एक देश - एक निवडणूक' नव्हे तर ' एक देश- एक पक्ष' हवा आहे. अशावेळी देवानेच या देशाचे रक्षण करावे, असेही चोडणकर यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details