महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पर्रिकर स्कूटरवरुन फिरणारे मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण देशात चर्चित - GOA

गोव्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही पर्रिकर अगदी सामान्य माणसांसारखे आयुष्य जगले. सरकारी बंगला नाकारत पर्रिकरांनी स्वत:च्या छोट्याशा घरात राहणे पंसत केले. त्यांच्या या अगदी साध्या जीवनशैलीमुळे पर्रिकर परिचित होते. मोबाईल फोनचे बीलसुद्धा ते स्वखर्चातून करत असायचे, असे सांगितले जाते.

मनोहर पर्रिकर

By

Published : Mar 17, 2019, 8:33 PM IST

पणजी - मनोहर पर्रिकर नेहमीच आपल्या साध्या सरळ जीवनशैलीसाठी ओळखले जात असत. कधी गोव्यात स्कूटरवरून फिरणे असेल तर कधी एखाद्या छोट्याशा हॉटेलमध्ये अगदी सामान्य लोकांप्रमाणे जेवण करताना पर्रिकर आपल्याला दिसले आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही पर्रिकर अगदी सामान्य माणसांसारखे आयुष्य जगले. सरकारी बंगला नाकारत पर्रिकरांनी स्वत:च्या छोट्याशा घरात राहणे पंसत केले. त्यांच्या या अगदी साध्या जीवनशैलीमुळे पर्रिकर परिचित होते. मोबाईल फोनचे बीलसुद्धा ते स्वखर्चातून करत असायचे, असे सांगितले जाते.

पर्रिकरांची स्कूटरवारी -

आपल्या स्कूटरवरून फिरताना पर्रिकर अनेकदा भाजीपाला मार्केटमध्ये भाजी खरेदीला यायचे, तर अनेकदा स्कूटरवरुन पाणटपरीवही दिसून यायचे. यामुळे स्कूटरवरुन फिरणारा मुख्यमंत्री म्हणून पर्रिकर संपूर्ण देशात चर्चिले गेले.

वाढत्या अपघातानंतर स्कूटर बंद -

गोव्यातील वाढत्या रस्ते अपघातानंतर पर्रिकरांनी दु:ख व्यक्त केले होते. यामुळे आपण स्कूटर वापरणार नसल्याचेही पर्रिकरांनी उद्विग्नतेतून म्हटले होते. गोवा विधानसभेत जाण्यासाठी पर्रिकर अनेकदा सायकलचा वापर करायचे. अनेक गोवावासिय याचे साक्षीदार आहेत. पर्रिकर अनेकदा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतानाही दिसून येत असत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details