गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर अत्यंत अत्यवस्थ, डॉक्टरांकडून प्रयत्न सुरूच - extremely critical
मुख्यमंत्री पर्रिकरांची प्रकृती अतिशय नाजूक झाली असून डॉक्टर्स त्यांच्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर
पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर अत्यंत अत्यवस्थ आहेत. त्यांची प्रकृती अतिशय नाजूक झाली असून डॉक्टर्स त्यांच्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर गोव्यातील मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरू आहेत. त्यांची तब्येत शनिवारी रात्री अचानक बिघडली होती.