नवी मुंबई - या कठीण काळात अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी सरकारने 'मोजमाप' पद्धतीने कमाई आणि उच्च वित्तीय तूट वाढविली पाहिजे, अशी सूचना आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केली आहे.
कोरोना विषाणुचा अर्थव्यवस्थेवरील होणारा परिणाम कमी करण्यासाठी सरकार संसाधने गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहे. अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी 2020-21 मध्ये बाजारातील कर्जाचा कार्यक्रम 54 टक्क्यांनी वाढवून १२ लाख कोटी रुपयांवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी महिन्यात तो 7.8 लाख कोटी रुपये होता.
मुद्रीकरण रिझर्व्ह बॅंकेच्या चलन छपाईशी संबंधित आहे, यासाठी सरकारी खर्चावर बंधन घालण्याची गरज नाही. त्यामुळे सरकारने अर्थव्यवस्थेच्या मजबूत करण्यासाठी काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी आवश्यकतेनुसार खर्च करावा, असे राजन यांनी नमूद केले.
खर्चाला प्राधान्य देत गरज नसलेल्या गोष्टींसाठी अवाजवी खर्च टाळण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, असा सल्ला राजन यांनी दिला. वित्तीय तूट आणि त्याचे कर्ज मध्यम मुदतीच्या कालावधीत परत मिळणार याबद्दल सरकारने चिंता करावी. आता जितका जास्त खर्च होईल तेवढेच पुढे कठीण जाईल, असे रघुराम राजन सांगतात.
दरम्यान, वित्तपुरवठा करण्यास असमर्थता किंवा केलेल्या खर्चातून पुन्हा आर्थिक लाभ होईल की नाही, याबद्दल भीती असू नये. मोजमाप केलेल्या मार्गाने कमाई करणे हे गेम-चेंजर किंवा आपत्ती असू शकत नाही. आपण आधीच मोजमाप करून खर्च करतो आहोत, ते फक्त अचूक असावे, असे राजन सांगतात.