नवी दिल्ली - गुगलची जी-मेल सेवा गुरुवारी सकाळापासून बाधित झाली आहे. त्यामुळे जगातील विविध भागातील वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, कंपनीने जी-मेल सेवा बाधित कशामुळे झाली, याचे कारण अद्याप स्पष्ट केले नाही.
जी-मेल सेवा बाधित; पूर्ववत करण्यासाठी गुगलचे प्रयत्न सुरू - जी-मेल सेवा बाधित
गुगलची जी-मेल सेवा गुरुवारी सकाळापासून बाधित झाली आहे. त्यामुळे जगातील विविध भागातील वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जी सूट स्टेटस डैशबोर्डनूसार गुगल जी-मेल पूर्ववत करण्यासाठी काम करत आहे. सध्या आम्ही समस्येवर काम करत आहोत.
जी-सूट स्टेटस डैशबोर्डनूसार गुगल जी-मेल पूर्ववत करण्यासाठी काम करत आहे. सध्या आम्ही समस्येवर काम करत आहोत. आम्ही दुपारी याबाबत स्पष्ट माहिती देऊ. तोपर्यंत आम्ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे गुगलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, जी-मेलसोबतच गुगल ड्राईव्ह, गुगल डॉक्स आणि गुगल मीट सारख्या गुगलच्या इतर सेवाही बाधित झाल्याची माहिती आहे.
जीमेलची ईमेल सेवा ही जगभरात सर्वाधिक वापरली जाणारी सेवा आहे. अगदी खासगी कामापासून ते कंपनीच्या अकाउंट्सपर्यंत अनेक ठिकाणी जीमेलचे ईमेल आयडी वापरले जातात. त्यामुळे सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पडतो आहे. यापूर्वी जुलैमध्ये जी-मेल सेवा तांत्रिक कारणामुळे खंडीत झाली होती.