महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'तुमचे सैनिक झटापटीमध्येही जिंकू शकत नाहीत, मग युद्धाचा विचारच सोडा'; चीनी ड्रॅगनचे फुत्कार!

"भारतातील देशभक्तांना आम्ही इशारा देऊ इच्छितो - जर तुमचे सैनिक आमच्या सैनिकांना निशःस्त्र लढाईमध्येही हरवू शकले नाहीत; तर बंदूका आणि इतर शस्त्रास्त्रे वापरण्याचाही काहीच फायदा होणार नाही. कारण, चीनी लष्कराची ताकद ही भारतीय लष्करापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे." अशा आशयाचा इशारा या वृत्तपत्रातून देण्यात आला आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांना सीमेवर शस्त्रे वापरण्याची परवानगी दिली होती, या पार्श्वभूमीवर हा अग्रलेख लिहिण्यात आला आहे.

Global Times editorial warns 'Indian nationalists'
'तुम्ही हाणामारीमध्येही जिंकू शकत नाही, मग युद्धाचा विचारच सोडा'; चीनी ड्रॅगनचे फुत्कार!

By

Published : Jun 22, 2020, 3:10 PM IST

बीजिंग - भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून चीनच्या बाजूने असलेल्या मोलदो येथे बैठक सुरू आहे. यामध्ये सध्या लडाखमधील तणावावर चर्चा सुरू आहे. वरवर जरी चीन शांततेसाठी चर्चा करत असल्याचे दाखवत असला, तरी 'ग्लोबल टाईम्स' वृत्तपत्राच्या संपादकीय लेखातून चीनी ड्रॅगनने आपले विखारी फुत्कार सोडणे सुरूच ठेवले आहे. ग्लोबल टाईम्स हे चीनी सरकारचे मुखपत्र मानले जाते. या वृत्तपत्रातील लेखामध्ये चीनने भारताला उघड उघड धमकी दिली आहे.

"भारतातील देशभक्तांना आम्ही इशारा देऊ इच्छितो - जर तुमचे सैनिक आमच्या सैनिकांना निशःस्त्र लढाईमध्येही हरवू शकले नाहीत; तर बंदूका आणि इतर शस्त्रास्त्रे वापरण्याचाही काहीच फायदा होणार नाही. कारण, चीनी लष्कराची ताकद ही भारतीय लष्करापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे." अशा आशयाचा इशारा या वृत्तपत्रातून देण्यात आला आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांना सीमेवर शस्त्रे वापरण्याची परवानगी दिली होती, या पार्श्वभूमीवर हा अग्रलेख लिहिण्यात आला आहे. आधी झालेल्या करारानुसार, लाईन ऑफ अ‌ॅक्चुअल कंट्रोल (एलएसी)च्या परिसरात कोणत्याही बाजूच्या जवानांना शस्त्र चालवण्याची परवानगी नाही. मात्र या नियमामध्ये बदल करत, मोदी सरकारने आपल्या जवानांना अशा सूचना दिल्या, की असामान्य परिस्थितीमध्ये ते सीमाभागातही शस्त्रे वापरू शकतील. तसेच, त्यांना त्या क्षणी योग्य वाटेल असा कोणताही निर्णय लष्कर स्वतःच घेऊ शकेल.

गलवान खोऱ्यामध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांदरम्यान झालेल्या भीषण हाणामारीनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. १५ जूनरोजी लडाख येथे झालेल्या हाणामारीमध्ये देशाच्या २० जवानांना वीरमरण आले होते.

ग्लोबल टाईम्सचे मुख्य संपादक हू शिजीन यांनी पुढे आपल्या लेखात म्हटले आहे, की भारत सरकारने खरोखरच असा निर्णय घेतला असेल, तर ते लष्करादरम्यान झालेल्या कराराचे उल्लंघन आहे. तसेच, भारताने हा सीमा-तणाव वाढवला आणि याची परिणीती युद्धात किंवा अगदी छोट्या चकमकीत जरी झाली तरीही ते एका अंड्याने स्वतःला दगडावर आपटून घेण्यासारखे असेल. ही परिस्थिती १९६२च्या युद्धापेक्षा खूप वेगळी असेल, कारण २०२०मध्येच चीनने आपल्या लष्करावर केलेला खर्च हा भारताच्या तीनपट अधिक आहे.

पुढे शिजीन लिहितात, की "चीनला भारतासोबत वाद वाढवायचे नाहीत; मात्र भारतीय लष्कराने केलेल्या कोणत्याही कृतीवर चाप लावण्याची क्षमता चीनी लष्करामध्ये आहे. त्यामुळे भारतातील अधिकारी तर्कशुद्ध निर्णय घेतील, आणि भारतीय लष्करही शांत राहील अशी आम्हाला आशा आहे."

हेही वाचा :भारत-चीनमध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावर बैठक, सीमावादावर चर्चा सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details