नवी दिल्ली - भारतातील आघाडीची फार्मा कंपनी ग्लेनमार्कने कोरोनावर औषध बनविले आहे. 'फावीपीराविर' नावाच्या गोळ्या कंपनीने तयार केल्या असून या गोळ्यांची क्लिनिकल ट्रायल करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे या गोळ्या रुग्णांवर प्रायोगिक तत्वावर वापरण्यात येणार आहेत. तसेच निष्कर्ष काय निघतात त्याचा अभ्यास करता येणार आहे.
ग्लेनमार्क कंपनीने कोरोनावर बनवलेलं औषध क्लिनिकल ट्रायलसाठी सज्ज - Glenmark pharma
ड्रग कंट्रोलर जनलर ऑफ इंडियाने(डीसीजीआय) क्लिनिकल ट्रालय घेण्यास परवानगी देण्यास आली आहे. कंपनीने अॅक्टिव्ह फार्मासिटीकल इंग्रीडियंट(एपीआय) तयार केले आहे.
'ड्रग कंट्रोलर जनलर ऑफ इंडिया'ने(डीसीजीआय) क्लिनिकल ट्रायल घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. कंपनीने अॅक्टिव्ह फार्मासिटीकल इंग्रीडियंट(एपीआय) तयार केले असून सौम्य आणि मध्यम स्वरूपाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर या गोळ्यांची ट्रायल घेण्यात येणार आहे, असे कंपनीने पत्रक जारी केली आहे.
इतर कोणत्याही कंपनीला क्लिनिकल ट्रायल घेण्याची परवानगी मिळाली नसून ग्लेनमार्क कंपनीला ही परवानगी मिळाली आहे. 'फावीपीराविर या गोळ्या फ्लू विरोधी काम करत असून जापनमध्ये यांच्या वापराला परवानगी मिळाली आहे. या गोळ्यांचा अभ्यास करण्यासाठी २८ दिवसांचा वेळ लागतो', असे कंपनीने सांगितले आहे.