महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आईसोबत भांडण झाल्यामुळे तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न - व्हायरल

शारदा रुग्णालयात तरुणीचे आईसोबत भांडण झाले. यामुळे नाराज झालेली तरुणी इमारतीवर गेली. तरुणी बाहेरिल बाजूस असलेल्या स्लॅबवरुन उडी मारणार इतक्यात उपस्थितांपैकी एकाने तिचा हात पकडला.

आईसोबत भांडण झाल्यामुळे तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

By

Published : Aug 3, 2019, 7:21 PM IST

नवी दिल्ली - ग्रेटर नोएडा येथील एका रुग्णालयात आईसोबत भांडण झाल्यानंतर तरुणीने इमारतीवरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या बघ्यांनी याचा व्हिडिओ करुन सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शारदा रुग्णालयात तरुणीचे आईसोबत भांडण झाले. यामुळे नाराज झालेली तरुणी इमारतीवर गेली. तरुणी बाहेरिल बाजूस असलेल्या स्लॅबवरुन उडी मारणार इतक्यात उपस्थितांपैकी एकाने तिचा हात पकडला. यावेळी, इतर काहीजणांनी तिला सुखरुपरित्या छतावर आणण्यास मदत केली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचली. घटनेची नोंद करुन पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. शारदा रुग्णालयाने याबाबत माहिती देताना म्हटले आहे, की तरुणी मानसिक रोगी आहे. आईसोबत किरकोळ कारणावरुन वाद झाल्यामुळे ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती.

ABOUT THE AUTHOR

...view details