हैदराबाद - बेगमपेठ येथील सेंट फ्रान्सिस महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी कॉलेजमधील वादग्रस्त ड्रेस कोडचा निषेध करत आंदोलन केले. महाविद्यालयाने गुडघ्याखाली येतील इतक्या लांबीची कुर्ती घालणे मुलींसाठी बंधनकारक केले आहे. याविरोधात विद्यार्थिनींनी सोमवारी आंदोलन केल्यानंतर महाविद्यालय परिसरात तणाव वाढला आहे.
महाविद्यालयातील वादग्रस्त ड्रेस कोडच्या निषेधार्थ विद्यार्थिनींचे आंदोलन
सोमवारी बेगमपेठ येथील सेंट फ्रान्सिस महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी कॉलेजमधील वादग्रस्त ड्रेस कोडचा निषेध करत आंदोलन केले. गेल्या दोन दिवसांपासून ठराविक लांबीची कुर्ती परिधान न केल्यास महाविद्यालय प्रशासन विद्यार्थिनींनी घरी परत पाठवत आहे. महाविद्यालयचे कर्मचारी कपड्यांची लांबी बघताना मुलींसोबत असभ्य वर्तन करत असल्याचा आरोपही विद्यार्थिनींनी केला आहे. कुठलेही आक्षेपार्ह कपडे मुली घालत नसताना महाविद्यालय जाचक निर्बंध लादत असल्यामुळे विद्यार्थिनींनी महाविद्यालय प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
महाविद्यालयाकडून ऑगस्ट महिन्यापासून विविध मार्गांनी विद्यार्थिनींचे मानसिक खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. ड्रेस कोडला विरोध नसून जाचक अटींना आमचा विरोध असल्याचे विद्यार्थिनी सांगत आहेत. गुडघ्याच्या वर एक बोट आखुड कुर्ती असेल तरी महाविद्यालय अशा विद्यार्थिनींना बाहेर काढत आहे. महाविद्यालयाचे कर्मचारी कपड्यांची लांबी बघताना मुलींसोबत असभ्य वर्तन करत असल्याचा आरोपही विद्यार्थिनींनी केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून ठराविक लांबीची कुर्ती परिधान न केल्यास महाविद्यालय प्रशासन विद्यार्थिनींनी घरी परत पाठवत आहे. कुठलेही आक्षेपार्ह कपडे मुली घालत नसताना महाविद्यालय जाचक निर्बंध लादत असल्यामुळे विद्यार्थिनींनी महाविद्यालय प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.