देहरादून- कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. यामुळे लग्नसमारंभासह सर्वच कार्यक्रम रद्द केले जात आहेत. काही लोक लग्नाची तारीख पुढे ढकलत आहेत, तर कोणी लग्न करण्यासाठी परवानगी मागण्यासाठी भटकत आहेत. असाच काहीसा प्रकार देहरादून येथे समोर आला आहे. लग्नासाठी परवानगी मिळवण्यासाठी येथे चक्क वधू मुलगी भटकत आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रकरणामुळे देहरादूनला रेड झोन घोषित करण्यात आले आहे. यामुळे पोलीस आणि प्रशासन सतर्कता बाळगत आहे. देहरादूनमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊन नियमांबाबत पोलीस कडक नियम पाळत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे महत्त्वाच्या कामांसाठी लोकांना परवानगी घ्यावी लागत आहे.