महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीर, लडाखचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन, नव्या नायब राज्यापालांनी घेतली शपथ - first Lt. Governor of the Union territory of Jammu and Kashmir

जम्मू-काश्मीर गुरुवारी (३१ ऑक्टोबरच्या) मध्यरात्रीपासून राज्य राहणार नसून त्याचे जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन झाले आहे.

जम्मू-काश्मीर

By

Published : Oct 31, 2019, 11:44 PM IST

श्रीनगर - जम्मू-काश्मीर गुरुवारी (३१ ऑक्टोबरच्या) मध्यरात्रीपासून राज्य राहिले नसून त्याचे जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन झाले आहे. या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांच्या नव्या राज्यपालांनी शपथ घेतली आहे. गिरीश चंद्र मुर्मू यांनी जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालपदाची शपथ घेतली आहे. तर आर. के. माथुर यांनी लडाखच्या नायब राज्यपालपदाची शपथ घेतली.

गिरीश चंद्र मुर्मू हे गुजरातचे माजी शासकीय अधिकारी आहेत. तर आर. के. माथूर हे माजी आयएएस अधिकारी आहेत.


संसदेत ५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल ३७० रद्द करण्यात आले होते. याच वेळी जम्मू-काश्मीरचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख असे विभाजन करण्याचे विधेयकही संमत झाले होते. यानंतर जम्मू-काश्मीरचे अधिकृतरित्या दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन झाले.

जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाला पदुच्चेरीप्रमाणे विधीमंडळ राहणार आहे. तर, लडाख हा चंडीगडप्रमाणे विधिमंडळाशिवायचा केंद्रशासित प्रदेश असेल. या दोन्हींचे प्रमुख दोन वेगवेगळे नायब राज्यपाल असतील. जम्मू-काश्मीरमध्ये आता पोलीस व कायदा-सुव्यवस्था यांवर केंद्र सरकारचे थेट नियंत्रण राहील. तर, तेथील जमिनीबाबतचे अधिकार तेथे निवडणुकीद्वारे येणाऱ्या सरकारला असतील.

ABOUT THE AUTHOR

...view details