महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जेएनयू हिंसाचाराला डावे पक्ष, राहुल गांधी जबाबदार - केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह - जेएनयू हिंसा

गिरिराज सिंह यांनी जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराला डावे पक्ष आणि राहुल गांधी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. सिंह म्हणाले, की या लोकांना जेएनयूला काय बनवायचे आहे, हे आम्हाला माहित नाही. मात्र, याच लोकांनी या जेएनयूचे वातावरण दूषित करण्याचे काम केले आहे.

patna
जेएनयू हिंसाचाराला डावे पक्ष, राहुल गांधी जबाबदार - केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

By

Published : Jan 6, 2020, 11:14 AM IST

Updated : Jan 6, 2020, 2:30 PM IST

पटना - जेएनयूमध्ये झालेला हिंसाचार हा डाव्या पक्षांनीच घडवून आणल्याचा आरोप केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केला आहे. जेएनयूमध्ये रात्रीच्या वेळी इतके लोक कसे काय घुसले? ही विचार करण्यासारखी बाब असल्याचेही ते म्हणाले. या हिंसाचाराला राहुल गांधीही जबाबदार असल्याचे सिंग म्हणाले.

जेएनयू हिंसाचाराला डावे पक्ष, राहुल गांधी जबाबदार - केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

हेही वाचा -जेएनयू हिंसाचाराचे मुंबईतही पडसाद; विद्यार्थी उतरले रस्त्यावर

गिरिराज सिंह यांनी जेएनयूत झालेल्या हिंसाचाराला डावे पक्ष आणि राहुल गांधी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. सिंह म्हणाले, की या लोकांना जेएनयूला काय बनवायचे आहे, हे आम्हाला माहित नाही. मात्र, याच लोकांनी या जेएनयूचे वातावरण दूषित करण्याचे काम केले आहे. जे देशासाठी चांगले नाही. देशातील जनतेला हे माहित आहे, की कशाप्रकारे जेएनयूमधील वातावरण खराब करत आहेत.

हेही वाचा -जेएनयू हिंसाचार : योगेंद्र यादव यांनाही धक्काबुक्की

हिंसाचारातील जखमी 'एम्स' मध्ये भरती

रविवारी रात्री दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठात काही चेहऱ्याला स्कार्फ बांधलेल्या टोळक्याने विद्यार्थी आणि शिक्षकांवर लाठ्या काठ्यांनी हल्ला करत तेथील सामानाचीही तोडफोड केली. अचानक आलेल्या या हल्ल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. या हल्ल्यात विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयुशी घोषसह २८ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

Last Updated : Jan 6, 2020, 2:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details