महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'देवबंद ही दहशतवादाची गंगोत्री' -

देवबंद ही दहशतवादाची गंगोत्री आहे. जगभरात जे काही दहशतवादी आहेत. ते सर्व येथेच तयार झाले आहेत, असे गिरिराज सिंह म्हणाले.

गिरिराज सिंह
गिरिराज सिंह

By

Published : Feb 12, 2020, 12:50 PM IST

सहारनपूर - केंद्रीय मंत्री व भाजपचे जेष्ठ नेते गिरीराज सिंह हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच प्रकाशझोतामध्ये आले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. देवबंद ही दहशतवादीची गंगोत्री असून येथेच दहशतवादी तयार केले जातात, असे गिरिराज सिंह म्हणाले.

देवबंद ही दहशतवादाची गंगोत्री आहे. जगभरात जे काही दहशतवादी आहेत. ते सर्व येथेच तयार झाले आहेत. हाफिज सईद असो किंवा इतर दहशतवादी सर्वांचा जन्म येथूनच झाला आहे, असे गिरिराज सिंह म्हणाले.

नागिरकत्व सुधारणाकायद्याविरोधातील आंदोलन हे देशविरोधी आहेत. सीएएच्या विरोधात आंदोलन करणारे सर्वच चुकीचे आहेत. सीएएमुळे कोणाचेही नागिरकत्व जाणार नाही. मात्र आंदोलक ही गोष्ट समजण्यास तयार नाहीत, असे गिरिराज म्हणाले.

लोकसंख्येवर नियंत्रण आणले नाही, तर देशाचा विकास होणार नाही. लोकसंख्या नियंत्रण कायदा लवकरात लवकर आणावा लागेल. जो कायद्याचे पालन करणार नाही, त्यांचा मतदानाचा हक्क रद्द केला पाहिजे. तसेच अशा लोकांवर आर्थिक आणि कायदेशीर बंधने देखील घातली गेली पाहिजे, असेही गिरिराज सिंह म्हणाले.

देवबंद काय आहे?

देवबंद हे उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील एक गाव आहे. या गावात दारुल-उलूम ही मुस्लीम धर्मातील अभ्यासकांची संस्था आहे. ही संस्था भारतात इस्लाममधल्या कट्टर अशा वहाबी पंथाचे शिक्षण देते. इजिप्त येथील मुस्लीम विद्यापीठानंतर या संस्थेचा दर्जा मुस्लीम धर्म अभ्यास जगतात वरचा मानला जातो. देशोदेशीचे विद्यार्थी येथे मुस्लीम धर्म, तत्त्वज्ञान इत्यादींचा अभ्यास करायला येतात. संस्थेतील विद्यार्थ्यांना व विद्वानांना देवबंदी म्हणतात.

ABOUT THE AUTHOR

...view details