नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्राम खान यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीत त्यांनी काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ट्रम्प यांनी मध्यस्थी करावी अशी, विनंती केली. यावर ट्रम्प यांनी मलादेखील भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास आवडेल, असे सांगितले.
काश्मीर प्रश्नावर ट्रम्प करणार मध्यस्थी; इम्रान खान यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट - narendra modi
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान खान यांनी काश्मीर मुद्यावर ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. तेव्हा या चर्चेदरम्यान, ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काश्मिर मुद्यावर तोडगा काढण्याची विनंती केल्याचे सांगितले. हा मुद्दा सोडवण्यासाठी मी काही मदत करु शकत असेन तर नक्कीच मी मध्यस्थीसाठी तयार असल्याचे ट्रम्प म्हणाले.

इम्रान खान आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केला. यामध्ये ट्रम्प यांनी काश्मीर मुद्यावर भाष्य केले. दरम्यान, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार व्हाईट हाऊसच्या प्रसिध्दीपत्रकात काश्मीर मुद्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.