लखनऊ- तबलिगी जमातच्या काही व्यक्तींचे रुग्णालयातील वर्तन हे आक्षेपार्ह असल्याची तक्रार गाझियाबादमधील रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी केली होती. यावर गाझियाबाद पोलीस प्रमुख आणि अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यांनी संयुक्तरित्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
दिल्लीमधील मरकझ कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या तबलिघी जमातच्या काही व्यक्तींना मंगळवारी आणि बुधवारी बसमधून गाझियाबादला नेण्यात आले होते. यानंतर त्यांना मरकझच्या मुख्य ठिकाणी नेण्यात आले. तिथे त्यामधील काही व्यक्ती पोलीस आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर थुंकले, अशी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गाझियाबादमधील एम.एम.जी. सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मुख्य वैद्यकीय अधीक्षकाकडे तक्रार दाखल केली आहे. यामध्ये असे म्हटले आहे, की जमातच्या रुग्णांपैकी विलगीकरणात असलेले काही रुग्ण वैद्यकीय कर्मचारी आणि परिचारिकांसोबत गैरवर्तन करत आहेत. यासोबतच, त्यामधील कित्येक रुग्ण हे अर्धनग्न अवस्थेत परिचारिकांसमोर येऊन, अश्लील गाणी म्हणत त्यांना त्रास देत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.