जयपूर -भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या सीमेवरुन भारतात आलेल्या एक मोठ्य़ा कार्गो विमानाला जयपूरच्या विमानतळावर उतरवले. हे विमान कराचीहून दिल्लीकडे जात होते. या विमानाने दिशा बदलल्याने वायुसेनेने ही कारवाई केली.
पाकिस्तानच्या कार्गो विमानास भारतीय वायुसेनेने जयपूरमध्ये उतरवले - Antonov
कराचीहून दिल्लीकडे जाणाऱ्या या विमानाने आपली दिशा बदलली. हे विमान गुजरातमार्गे भारतात आले आणि राजस्थानच्या दिशेने पुढे जात होते. यावेळी वायुसेनेच्या विमानाने पाकिस्तानच्या विमानास घेरले.
पाकिस्तानच्या कार्गो विमानास भारतीय वायुसेनेने जयपूरमध्ये उतरवले
कराचीहून दिल्लीकडे जाणाऱ्या या विमानाने आपली दिशा बदलली. हे विमान गुजरातमार्गे भारतात आले आणि राजस्थानच्या दिशेने पुढे जात होते. यावेळी वायुसेनेच्या विमानाने पाकिस्तानच्या विमानास घेरले. त्यानंतर जयपूर विमानतळावर उतरवले. विमान उतरवल्यानंतर दोन्ही वैमानिकांशी चौकशी करण्यात येत आहे.
जयपूर विमानतळावर उतरवलेले विमान हे एंटोनोव एएन-12 हैवी कार्गो प्लेन आहे. जे जॉर्जिया येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.