नवी दिल्ली - पाकिस्तानसाठी आक्रमक भूमिका घेणारे माजी क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार गौतम गंभीर यांनी एका पाकिस्तानी मुलीला मदत केली आहे.
पाकिस्तानच्या एका कुटुंबाला त्यांच्या 6 वर्षाच्या मुलीच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी भारतात यायचे होते. त्यांच्या मदतीसाठी गौतम गंभीर पुढे आले आणि त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहून पत्र लिहले. गौतम गंभीर यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांकडे ती मुलगी व तिच्या कुटुंबीयांना उपचारासाठी व्हिसा देण्याची परवाणगी मागितली होती.