'एक जागा जिंकण्यासाठी इतका किळसवाणा आरोप कसे करू शकतात?' गौतमचा केजरीवालांवर 'गंभीर' हल्ला - win
'मी मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो की, निवडणुका येतील-जातील. मात्र, ज्या दिवशी तुम्ही तुमचे स्वत्व आणि सच्चेपणा हरवाल, त्या दिवशी तुम्ही सर्व काही हराल. एक जागा जिंकण्यासाठी जर तुम्ही इतका किळसवाणा आरोप करत असाल, तर माझ्याकडे याविषयी बोलण्यासाठी शब्द नाहीत,' असे गंभीर याने म्हटले आहे.
नवी दिल्ली - भाजपने दिल्लीतील लोकसभेच्या सातही जागा खिशात घातल्या. यानंतर शनिवारी भाजपच्या विजयी उमेदवारांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेचे आभार मानले. या पत्रकार परिषदेतच पूर्व दिल्लीतून निवडून आलेल्या गौतम गंभीरने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मोठा आरोप केला आहे.
'मी मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो की, निवडणुका येतील-जातील. मात्र, ज्या दिवशी तुम्ही तुमचे स्वत्व आणि सच्चेपणा हरवाल, त्या दिवशी तुम्ही सर्व काही हराल. एक जागा जिंकण्यासाठी जर तुम्ही इतका किळसवाणा आरोप करत असाल, तर माझ्याकडे याविषयी बोलण्यासाठी शब्द नाहीत,' असे गंभीर याने म्हटले आहे.
गौतमने दिल्लीमध्ये निवडणुकीआधी त्याच्या प्रतिस्पर्धी आतिशी यांच्याविरोधात अश्लील भाषेतील पत्रके वाटल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला होता. त्या वेळी गौतमने हे आरोप नाकारले होते. 'हे आरोप खरे ठरले तर, मी निवडणुकीतून माझे नाव मागे घेईन. मात्र, आरोप खोटे ठरले तर केजरीवाल राजकारण सोडून देणार आहेत का?' असा सवाल त्याने केला होता.