महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मेरठ : सिलेंडरच्या स्फोटात इमारत कोसळून दोघांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली दबले

उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यात सिलेंडरचा स्फोट झाल्याने दोन मजली इमारत कोसळली. घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

By

Published : Oct 29, 2020, 1:34 PM IST

Updated : Oct 29, 2020, 5:01 PM IST

cylinder
इमारत कोसळली

लखनऊ - उत्तरप्रदेशातील मेरठ जिल्ह्यामध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की ज्या इमारतीत स्फोट झाला ती इमारत कोसळली. तसेच शेजारील घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. गुरूवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस आणि आपत्ती निवारण पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

शेजारील घरांचेही नुकसान

दोन मजली इमारत कोसळली

सरधना गावातील एका दोन मजली घरात सिंलेडरचा स्फोट झाला. स्फोटात ह्या इमारतीचे छत कोसळले. तसेच शेजारील घरांचेही नुकसान झाले. स्फोट झाला तेव्हा अनेक जण घरामध्ये होते. स्फोटानंतर छत कोसळल्याने अनेक जण मलब्याखाली दबले. दोघांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले.

चहा बनवताना झाला स्फोट

ईटीव्ही भारत प्रतिनिधी घटनास्थळावरून आढावा घेताना

एका घरामध्ये चहा बनवत असताना सिलेंडरमधून गॅसची गळती झाली. गळती लवकर लक्षात न आल्याने सिलेंडरचा स्फोट झाला. आवाजाने संपूर्ण परिसर हादरला. शेजारी नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह घटनास्थळापासून दूर फेकले गेले होते. शेजारील घरांचेही स्फोटामुळे नुकसान झाले. यामध्ये सुमारे सहाजण जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे.

स्फोटात छत कोसळले

फटाक्यांमुळे स्फोट झाल्याचा दावा

ईटीव्ही भारतने घटनास्थळी जाऊन स्थानिक नागरिकांशी चर्चा केली. त्यामधून या घटनेचे इतर कांगोरेही पुढे येत आहेत. या इमारतीपासून जवळच फटाके बनविण्यात येतात. तेथील फटाके इमारतीतील असिम नामक व्यक्तीच्या घरात ठेवण्यात आले होते. दिवाळी जवळ आल्याने मोठ्या प्रमाणात फटाके घरी होती. त्यामुळेच स्फोट झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. मात्र, सिलेंडरमुळे स्फोट झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. घटनास्थळी फटाक्यांचे पुरावेही आढळून आले आहेत.

Last Updated : Oct 29, 2020, 5:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details