गांधीनगर -कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या एका हस्तकासोबत काम करणारा गुंड बाबू सोलंकी याला अटक करण्यात आली आहे. गुजरातमधील दहशतवाद विरोधी पथकाने ही कामगिरी केली आहे. तो महेसना शहराकडे जात असताना गांधीनगरजवळच्या अदालाजमधून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर चोरी, खुनाचा प्रयत्न आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत.
दाऊदच्या हस्तकासाठी काम करणाऱ्या गुंडाला अटक; गुजरात एटीएसची कारवाई.. - babu solanki
मिळालेल्या माहितीनुसार, सोळंकी हा बऱ्याच वर्षांपासून दाऊदचा हस्तक शरीफ खान याच्यासाठी काम करत होता. खान हा सध्या पाकिस्तानमध्ये लपला असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोळंकी हा बऱ्याच वर्षांपासून दाऊदचा हस्तक शरीफ खान याच्यासाठी काम करत होता. खान हा सध्या पाकिस्तानमध्ये लपला असल्याचे बोलले जात आहे. सोळंकी याच्या टोळीने अहमदाबादच्या एका व्यापाऱ्याकडून दहा कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. यासंबंधी सुरू असलेल्या तपासामध्ये त्याला अटक करण्यात आली.
सोळंकी हा मुंबईमध्ये बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. मात्र, गुजरातमधील त्याचे गुन्हे सुरूच होते. १९९९ ते २०१९ यादरम्यान त्याच्यावर दरोडा, खून आणि खंडणीचे चार गुन्हे दाखल झाले असल्याचेही दहशतवाद विरोधी पथकाने सांगितले.