हैदराबाद- आंध्रप्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील कारमचेडू येथे एका २५ वर्षीय महिलेवर अज्ञातांकडून बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.
अज्ञाताकडून २५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार - प्रकाशम
आंध्रप्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील कारमचेडू येथे एका २५ वर्षीय महिलेवर अज्ञातांकडून बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.
पीडितेचा ३ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. काही कारणास्तव तिचा घटस्फोट झाल्याने ती माहेरी राहून एका दुकानात काम करत होती. कामादरम्यान तिची एका तरुणाशी ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले होते. ते दोघे भेटण्यासाठी ती करमचेडू येथील एका पुलाजवळ शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गेले होते. तरुणाशी बोलताना दुचाकीवरून तीन अज्ञात व्यक्ती त्या ठिकणी आले. त्यानंतर त्यांनी पीडितेचा मोबाईल आणि पैसे हिसावून तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेवर सध्या चिराला येथील शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहे.