ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) - चोरांनी कांद्याच्या 12 गोण्या पळवल्याची घटना मध्यप्रदेशमध्ये घडली. कांद्याचे वाढते भाव पाहता कांद्याला सोन्यासारखे दिवस आले आहेत. ग्वाल्हेर शहरातील छत्री भाजी मंडईतील ही घटना असून, चोरीनंतर मंडईमध्ये गोंधळ उडाला आहे.
मध्यप्रदेशमध्ये तब्बल 60 हजार रुपयांच्या कांद्याची रात्रीत चोरी हेही वाचा - महाविकास आघाडीचे सरकार फसवे नाही, जे बोलते ते करते- नवाब मलिक
दिल्ली, पुणे, लखनौ, चेन्नई इत्यादी मोठ्या शहरांमध्ये किरकोळ बाजारात कांद्याचे भाव वाढतच आहेत. जनकगंज पोलिसांनी कांदा चोरीची तक्रार नोंदवली असून पोलीस कांदा चोरांचा तपास करत आहेत. व्यापाऱ्याने अजून चांगला भाव मिळेल या आशेपोटी कांद्याची साठवणूक केली होती. जवळपास 60 हजार रुपये किमतीचा कांदा असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा - मुंबईतील 'हे' चर्च ठरत आहे नाताळचे खास आकर्षण