अमरावती - भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे जनक असलेले महात्मा गांधी, हे एक उत्कृष्ट आहारतज्ज्ञ म्हणूनदेखील ओळखले जात. त्यांनी केलेले सत्याग्रह, उपोषण यांमध्ये लोकांसह त्यांना साथ दिली ती त्यांच्या शरीराच्या आणि मनाच्या आरोग्याने. गांधीजींनी अनेक यात्रा कितीतरी किलोमीटर चालत केल्या. जे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शारिरिक आणि मानसिक ताकदीची आणि सहनशक्तीची गरज होती. जी त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमधून पूर्ण होत. १९४२ ते १९४४ च्या दरम्यान, पुण्याच्या आगा खान पॅलेसमध्ये कैदेत असताना, बापूंनी आपल्या आरोग्यविषयक टीपा लिहून ठेवल्या होत्या. या टीपा, नंतर सुशिला नायर यांनी इंग्रजीत भाषांतरीत केल्या. मानवांना निरोगी आयुष्य जगण्यासाठीची माहिती भरपूर प्रमाणात असल्यामुळे, गांधीजींनी आपल्या प्राचीन शास्त्रांची नेहमीच प्रशंसा केली.
गांधीजींनी एखाद्या योगीप्रमाणे आयुष्य जगण्यावर भर दिला. तसेच त्यांनी आहार-नियंत्रणाद्वारे आपल्या ज्ञानेंद्रियांवर ताबा ठेवणारे शास्त्र, म्हणजेच ब्रह्मचार्य पाळले. उपवास म्हणजे अन्नत्याग नव्हे, तर अपायकारक अन्नाचा त्याग होय. पृथ्वी, पाणी, निर्वात, प्रकाश आणि हवा यांचे मिश्रण म्हणजे मानवी शरीर असे ते म्हणत. ज्यामध्ये कृती करणाऱ्या पाच भावना - हात, पाय, तोंड, गुदद्वार आणि जननेंद्रिये; आणि आकलन करणाऱ्या पाच भावना - त्वचेमार्फत स्पर्शाची भावना, नाकाद्वारे वास, जिभेद्वारे चव, डोळ्यांद्वारे पाहणे आणि कानांद्वारे ऐकणे यांचा समावेश आहे. त्यांनी अपचन हे सर्व प्रमुख आजारांचे एकमेव कारण असल्याचे सांगितले, जे या घटकांमधील विकृतीचे लक्षण आहे. आणि यावर अनेक पारंपारिक उपाय देखील सुचविले.
हेही वाचा : महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा...