महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कंडेल सत्याग्रहासाठी महात्मा गांधींचा छत्तीसगड दौरा, ब्रिटीश सरकारची उडाली घाबरगुंडी - धरमतरी

धरमतरी येथील शेतकरी पाण्याची चोरी करत असल्याचे म्हणत अन्यायकारी इंग्रज सरकारने सारा वसूली करण्यास सुरुवात केली होती. त्याविरोधात लढा देण्यासाठी गांधीजी कंडेला येथे आले होते.

महात्मा गांधी

By

Published : Sep 14, 2019, 12:00 PM IST

Updated : Sep 14, 2019, 3:16 PM IST

रायपूर - भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांविरुद्ध जनमत एकत्र करण्यात महात्मा गांधीचा मोठा वाटा आहे. गांधीजींची लोकप्रियता एवढी होती की त्यांच्या सभेसाठी दुर्गम खेड्यापाड्यातूनही लोक येत. महात्मा गांधींनी हरिजन उद्धाराचे कार्यही छत्तीसगढ राज्यातूनच सुरू केले. तसेच शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सभा घेण्यासाठी महात्मा गांधी दोन वेळा रायपूरला आले होते.

हेही वाचा - दामोहमधील गांधीजींनी वास्तव्य केलेले घर; आज आहे दुर्लक्षित...

महात्मा गांधी १९२० साली कंडेल सत्याग्रहामध्ये सहभागी होण्यासाठी छत्तीसगडमध्ये आले होते. जाणून घेऊया महात्मा गांधीजींच्या कंडेल सत्याग्रहाबद्दल..

धरमतरीच्या शेतकऱ्यांनी उपसले होते आंदोलनाचे हत्यार

१९२० सालापर्यंत महात्मा गांधी एक लोकप्रिय नेते म्हणून भारतभर ओळखले जाऊ लागले होते. गांधींद्वारे लोक आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवत होते. धरमतरी येथील शेतकरी पाण्याची चोरी करत असल्याचे म्हणत अन्यायकारी इंग्रज सरकारने कर वसूली सुरू केली होती. तसेच शेतकऱ्यांची जनावरे जप्त करण्यात येत होती. त्यामुळे शेतकरी अत्यंत दु:खी होते. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी आंदोलन करायचे ठरवले होते. त्यांसाठी गांधींना सहभागी करुन घेण्यासाठी स्थानिक नेते पंडित सुंदरलाल शर्मा कोलकात्याला गेले होते.

हेही वाचा - छिंदवाडा : गांधीजींनी जिथे असहकार चळवळीचा रचला पाया

२० सप्टेंबर १९२० मध्ये रायपूर रेल्वे स्टेशनवर गांधीजींचे जोरदार स्वागत करण्यात आले. गांधीजींना पाहण्यासाठी तसेच भेटण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. त्यावेळी गांधीजींनी रायपूरमधील एका मैदानावर सभा घेतली होती. ते मैदान आताही गांधीजींच्या नावाने ओळखले जाते. रायपूरला सभा घेतल्यानंतर गांधीजी धरमतरीला गेले होते.

गांधी धरमतरीला येत असल्याची कुणकूण इंग्रजांना लागताच इंग्रजांची घाबरगुंडी उडाली होती. तत्काळ सारा वसूली थांबवण्यात आली होती. तसेच सिंचन विभागाला दिलेले अन्यायकारक आदेश इंग्रज सरकारने मागे घेतले. यावरुन गांधीजींचा प्रभाव दिसून येतो.

हेही वाचा - महात्मा गांधी आणि असहकार चळवळ

धरमतरीवरुन माघारी आल्यानंतर गांधीजींनी राज्यातील कंकाली पारा येथे असलेल्या आनंद समाज ग्रंथालयाजवळ सभा घेतली होती. तेथे गांधीजींनी ज्या स्टेजवर सभा दिली होती, त्या स्टेजच्या वीटा आठवण म्हणून नागरिक घरी घेऊन आले होते. त्यावरुन गांधीजींच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. त्यावेळी लोकांनी स्वराज फंडामध्येही भरभरुन देणगी दिली होती

Last Updated : Sep 14, 2019, 3:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details