महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गांधीवादी विचारधारा आणि समकालीन वैश्विक संघर्ष - गांधीवादी विचारधारा

आंग सान सू की (1991 मधील नोबेल शांती पुरस्कार विजेता) आणि नेल्सन मंडेला (दक्षिण अफ्रिकी वर्णभेदविरोधी क्रांतिकारक आणि 1994 पासून 1999 पर्यंत दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्रपती) अशा व्यक्तींनी अहिंसेच्या सिद्धांतांचे पालन केले. हे लोक अपेक्षित बदल घडवून आणण्यात यशस्वी ठरले.

गांधीवादी विचारधारा

By

Published : Aug 22, 2019, 11:39 AM IST

Updated : Aug 22, 2019, 3:16 PM IST

विश्व शांतीला सर्व देशांदरम्यान आपापसांतील सहकार्य हा आदर्श मानण्यात आला आहे. यामध्ये अहिंसेच्या विचाराचाही समावेश आहे. यात सर्व देश स्वेच्छेने युद्ध थांबवण्यासाठी जबाबदारीने व्यवहार करतात. तरीही, आज जगामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष पेटलेले आहेत. आंतरराष्ट्रीय सीमा विवाद, जातीय संघर्ष, धार्मिक कट्टरतावाद, नदी-जल अशा प्रकारचे अनेक विवाद अनेक दशकांपासून सुरू आहेत. अनेकदा चर्चा करूनही या समस्या सुटलेल्या नाहीत. मध्यस्थांच्या भूमिकेचाही कोणताही परिणाम झालेला नाही.

आंतरराष्ट्रीय विवाद सोडवण्यासाठी वैश्विक मंचावर गांधीजी आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गाकडे आशेचा किरण म्हणून कोणी कदाचितच पाहात असेल. गांधीजींचा वैश्विक पातळीवर आदर-सन्मान केला जातो. तरीही ते लोक गांधीजींना 'समस्येचे समाधान देणारे' मानत नाहीत. उलट, सध्याचा संघर्ष अधिक गुंतागुंतीचा असल्याचे मानतात. तसेच, यावर गांधीवादाच्या माध्यमातून तोडगा निघत नाही. मात्र, त्यांचे विचार सामाजिक आणि सांस्कृतिक कारणांमुळे एक टॉनिक मानले जाते.

जेथे गांधीजींचा जन्म झाला आणि त्यांनी काम केले, त्या भारतात त्यांना राष्ट्रपित्याचा दर्जा आहे. मात्र, राजनैतिक आणि आर्थिक पातळ्यांवर त्यांच्या विचारांचे महत्त्व फक्त ग्रामीण अर्थव्यवस्थेतील स्वच्छता आणि कॉस्मेटिक सुधारणांसाठी औषधाच्या रूपातील मानले जातात. अशा प्रकारचे वास्तव असताना वैश्विक संदर्भात गांधीजींच्या अहिंसेची काय अवस्था असेल, याचा अंदाज लावणे शक्य आहे.

तरीही आज अनेक संघर्ष बंदी तंत्रांमध्ये गांधीजी त्या वेळी जे सांगत होते, त्याची छाया पहायला मिळते. महात्मा गांधीजी म्हणाले होते, 'आपल्यात प्रथम सहिष्णुता असली पाहिजे. जेणेकरून आपण आपल्यातील मतभेद सौहार्दपूर्वक सोडवू शकू. नाहीतर, आपण तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीला मार्ग खुला करून देऊ. हे होणे टाळले पाहिजे. सौहार्दपूर्वक व्यवहाराने ते टाळणे शक्य आहे.'

'तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीपासून वाचण्यासाठी सहिष्णुतेत सामाजिक, जातीय, धार्मिक आणि राजनैतिक तत्वांचे अनेक पैलू आहेत. 'जेव्हा सहिष्णुता कमी होते, तेव्हा शांती संकटात सापडते. संघर्षाच्या कारणांचे वास्तविक चित्र ओळखले पाहिजे. यामुळे संघर्षाचे कारण सापडू शकते.'

मात्र, आताच्या जगात अशा प्रकारचे उदात्त, आदर्शवादी विचार कितपत प्रासंगिक आहेत? आंतरराज्यीय संघर्षही अत्यंत वेगाने वाढत आहे,' याचे उत्तर द्यावेच लागेल.

तरीही काही उदाहरणे अशी आहेत, ज्यामध्ये काही व्यक्तींनी आपल्या विचारांच्या आणि कार्याच्या माध्यमातून शांतीसाठी प्रयत्न केले आहेत. तसेच, त्यांच्या समुदायांमध्येही हदल घडवून आणले आहेत. ते सर्व शांती आणि अहिंसेच्या गांधीवादी प्रयोगांशी संबंधित आहेत. यामध्ये मार्टिन अहतीसारी (2008), मोहम्मद यूनूस (2006), वंजारी महायभाई (2004) आणि शिरीन एबादी (2003) आदी लोकांचा समावेश आहे. या लोकांनी आपापल्या कार्यक्षेत्रात समाजात शांती आणण्यासाठी प्रभावीपणे काम केले आहे. त्यामध्ये पायाभूत बदल केले आहेत.

आंग सान सू की (1991 मधील नोबेल शांती पुरस्कार विजेता) आणि नेल्सन मंडेला (दक्षिण आफ्रिकी वर्णभेदविरोधी क्रांतिकारक आणि 1994 पासून 1999 पर्यंत दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्रपती) अशा व्यक्तींनी अहिंसेच्या सिद्धांतांचे पालन केले. हे लोक अपेक्षित बदल घडवून आणण्यात यशस्वी ठरले.

(लेखक-राजीव राजन) या लेखातील विचार लेखकाचे स्वतःचे आहेत. यांच्याशी ईटीवी भारतचा काहीही संबंध नाही.

Last Updated : Aug 22, 2019, 3:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details