नवी दिल्ली - राजीव गांधी हे पंतप्रधान असताना आयएनएस विराट युध्दनौका ही आपल्या नातेवाईकांसोबत सुट्टी घालवण्यासाठी वापरायचे. गांधी कुटुंबियांनी आपल्या खासगी वापरासाठी आयएनएस विराट युध्दनौकेचा वापर केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. बुधवारी दिल्ली येथील रामलीला मैदानावर आयोजीत प्रचार सभेत त्यांनी पुन्हा एकदा गांधी कुटुंबियांवर जोरदार हल्लाबोल केला.
आयएनएस विराट युध्दनौकेचा वापर राजीव गांधींनी फिरण्यासाठी केला - मोदी - family
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर सभा घेतली. या सभेत त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली.
राजीव गांधी हे १० दिवस सुट्टी घालवण्यासाठी कुटुंबियांसोबत गेले होते. त्यावेळी त्यांनी आयएनएस विराट या युध्दनौकेचा वापर कुटुंबियांना फिरवण्यासाठी केला. आयएनएस विराट ही युध्दनौका गांधी कुटुंबियांना घेऊन एक बेटावर १० थांबली होती.
गांधी कुटुंब ज्या बेटावर गेले होते. तिथे त्यांची सेवा करण्याचे काम लष्कर व सरकारने केले होते. यासाठी विशेष हेलिकॉप्टरसुध्दा वापरण्यात आला होता. प्रशासनानेच याचे नियोजन केले होते. जेंव्हा एक कुटुंब सर्वोच्च होते, तेंव्हा देशाची सुरक्षा धोक्यावर येते, असेही मोदी म्हणाले.