महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महात्मा गांधींना 'ईटीव्ही भारत'ची संगीतमय आदरांजली.. मोदींकडून माध्यम सम्राट रामोजी रावांचे कौतुक - Gandhi@150 Special song

महात्मा गांधींच्या १५०व्या जयंती निमित्त, 'ईटीव्ही भारत'ने बापूंना आदरांजली वाहण्यासाठी मानवतेवर भाष्य करणारे गांधीजींचे लोकप्रिय भजन 'वैष्णव जन तो तेने कहिये' हे खास गीत बनवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लोक कल्याण मार्ग -7 येथे आयोजित कार्यक्रमात या खास गीताचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. संपूर्ण भारतभरातील कलाकारांनी मिळून हे गीत गायले आहे.

महात्मा गांधींना संगीतमय आदरांजली वाहणारा 'ईटीव्ही भारत'चा व्हिडिओ पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रसिद्ध

By

Published : Oct 21, 2019, 8:29 PM IST

नवी दिल्ली -महात्मा गांधींच्या १५०व्या जयंती निमित्त, 'ईटीव्ही भारत'ने बापूंना आदरांजली वाहण्यासाठी मानवतेवर भाष्य करणारे गांधीजींचे लोकप्रिय भजन 'वैष्णव जन तो तेने कहिये' हे खास गीत बनवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लोक कल्याण मार्ग -7 येथे आयोजित कार्यक्रमात या खास गीताचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. संपूर्ण भारतभरातील कलाकारांनी मिळून हे गीत गायले आहे.

महात्मा गांधींना संगीतमय आदरांजली वाहणारा 'ईटीव्ही भारत'चा व्हिडिओ पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रसिद्ध
महात्मा गांधींच्या १५०व्या जयंती निमित्त विवध स्टोरीज केल्यामुळे आणि खास गीत बनवल्यामुळे रामोजी राव यांचे मोदींनी कौतूक केले. रामोजी राव वयाने आपल्यापेक्षा मोठे आहेत. त्यांनी ज्या प्रकारे देशातील सर्वश्रेष्ठ गायकांसोबत मिळून गीत प्रसिद्ध केले. ते खरचं वाखण्याजोगे असल्याचं मोदी म्हणाले.ईटीव्ही भारतच्या व्हिडिओसह पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधी यांच्या 150वी जयंती या विषयावर आधारित आणखी तीन व्हिडिओ प्रसिद्ध केले. हे व्हिडिओ राजकुमार हिरानी, ​​तारक मेहता समूह आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने तयार केले होते. या कार्यक्रमाला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. 'वैष्णव जन तो तेने कहिये'...
'वैष्णव जन तो तेने कहिये'...
यापूर्वीही या गीताची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्तुती केली आहे. 'ईटीव्ही भारत'चे गाणे रिट्विट करत, या सुंदर गाण्याच्या निर्मितीसाठी ईटीव्ही भारतचे अभिनंदन, असा संदेश त्यांनी लिहला होता. त्यासोबतच केंद्रीय रेल्वे आणि व्यापार मंत्री पियूष गोयल आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही हे गीत स्वतःच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत ईटीव्ही भारतचे कौतुक केले होते.बापूंच्या १५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून, 'ईटीव्ही भारत'ने गांधी आणि आजची समाजव्यवस्था यासंदर्भात एक लेखमाला प्रसिद्ध केली होती. या लेखमालेमध्ये गांधींचे विचार, त्यांची दूरदृष्टी, त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांची कारणीमीमांसा तसेच बापूंबद्दल सामान्यांना माहित नसलेल्या गोष्टींचा समावेश होता. या लेखमालेसह, एक व्हिडिओ स्टोरीजची मालिकादेखील प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये भारतातील विविध ठिकाणांशी गांधीजींच्या असलेल्या आठवणींचा समावेश होता.

ABOUT THE AUTHOR

...view details