नवी दिल्ली - महात्मा गांधींच्या १५०व्या जयंती वर्षानिमित्त, 'ईटीव्ही भारत'ने बापूंना आदरांजली वाहणारे विशेष गीत लाँच केले होते. या गीताची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रशंसा केली आहे. 'ईटीव्ही भारत'चे गाणे रिट्विट करत, या सुंदर गाण्याच्या निर्मितीसाठी ईटीव्ही भारतचे अभिनंदन केले आहे.
"पूज्य बापू के प्रिय भजनों की शानदार प्रस्तुति के लिए @Eenadu_Hindi आपका हार्दिक अभिनंदन। महात्मा गांधी के सपनों के अनुरूप स्वच्छ भारत अभियान में जागरूकता फैलाने में मीडिया जगत का बहुमूल्य योगदान रहा है। अब बारी देश को सिंगल यूज प्लास्टिक से मुक्त करने की है।" असे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'ईटीव्ही भारत'ची प्रशंसा केली आहे.
हेही वाचा : गांधी @150 : रामोजी राव यांच्या हस्ते बापूंच्या प्रिय भजनाचे लोकार्पण
गांधीजींच्या आवडत्या भजनांपैकी एक म्हणजे, "वैष्णव जन तो तेने कहिए जे, पीड़ पराई जाने रे, पर दुख्खे उपकार करे तोये, मन अभिमान न आने रे..." हे आहे. या भजनामध्ये, प्रत्येकासाठी मनात करुणा असलेल्या एका वैष्णवाच्या जीवनाचे आणि त्याच्या आदर्शांचे अत्यंत सुंदर असे वर्णन करण्यात आले आहे. १५ व्या शतकातील गुजराती कवी नरसिंह मेहता, यांच्या भजनांद्वारे देशाला एकत्र जोडण्याची संकल्पना 'ईटीव्ही भारत'ने मांडली. या भजनाच्या माध्यमातून नरसिंह मेहता यांच्या लिखाणात प्रकट झालेल्या सामान्य माणसाच्या परिक्षा आणि समस्या ठळकपणे समोर आल्या आहेत. विविधतेमध्येच भारताचे सौंदर्य दडले आहे. विविधतेतील एकतेत देशाची ताकद आहे. हीच विविधता अधोरेखीत करण्यासाठी 'ईटीव्ही भारत'ने देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील उत्कृष्ट गायकांना एका व्यासपीठावर आणले आहे.
पंतप्रधानांसह इतर नेत्यांनीदेखील या गीताची स्तुती केली आहे. 'ईटीवी भारत की ओर से देश के सर्वश्रेष्ठ गायकोंने बापू को दी संगीतमय श्रद्धांजलि' असे ट्विट करत गोयल यांनी या गीताची स्तुती केली आहे. तर, उपराष्ट्रपती वंकय्या नायडू यांनी #India, #MahatmaGandhi या हॅशटॅग्जसह ट्विट केले आहे.
हेही वाचा : गांधी@150; ईटीव्ही भारतच्या माध्यमातून देशातील सर्वश्रेष्ठ गायकांकडून बापूंना संगीतमय श्रद्धांजली