महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हे राम..! गांधीजयंती दिवशीच बापूंचा अस्थिकलश गेला चोरीला...

बापूंच्या जयंतीनिमित्त, १९७० मध्ये हा कलश रीवामध्ये आणून, दर्शनासाठी लक्ष्मणबागमध्ये ठेवण्यात आला होता. हा कलशच काल चोरट्यांनी पळवून नेला. पोलिसांनी अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

रीवा महात्मा गांधी कलश

By

Published : Oct 3, 2019, 9:14 PM IST

भोपाळ- संपूर्ण देश काल उत्साहात गांधी जयंती साजरी करत होता, मात्र मध्य प्रदेशच्या रीवा गावामध्ये चक्क गांधीजींच्या अस्थींचा कलशच चोरट्यांनी पळवून नेला. बापूंच्या जयंतीनिमित्त, १९७० मध्ये हा कलश रीवामध्ये आणून, दर्शनासाठी लक्ष्मणबागमध्ये ठेवण्यात आला होता.

हे राम..! गांधीजयंती दिवशीच बापूंचा अस्थिकलश गेला चोरीला...

रीवामध्ये याआधीही काही अज्ञात समाजकंटकांनी गांधीजींच्या प्रतिमेवर अपशब्द लिहिण्याचा प्रकार केला होता. त्यातच आता ही घटना झाल्यामुळे लोकांमध्ये आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष आहे. स्थानिक काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणात गोडसे समर्थकांवर चोरीचा आरोप करत, अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

लक्ष्मणबागमध्ये दररोज शेकडो लोकांची ये-जा सुरु असते. तसेच, साधू-संत आणि भक्तांचादेखील ओढा असतो. असे असतानादेखील, कोणाच्याही नकळत हा प्रकार घडल्यामुळे पोलिसही संभ्रमात पडले आहेत. पोलिसांनी अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास सुरु आहे.

हेही वाचा : पुराचा आढावा घेण्यासाठी गेले अन् स्वतःच पडले पाण्यात...

ABOUT THE AUTHOR

...view details