गांधी १५० : चिराला-पिराला आंदोलन, आणि गांधीजींची तुटलेली काठी...
स्वातंत्र्य लढ्यादरम्यान 'चिराला-पिराला' आंदोलनाच्या निमित्ताने गांधीजींनी आंध्र प्रदेशला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी 'सारस्वत निकेतन ग्रंथालया'च्या नव्या इमारतीची पायाभरणी केली. या पायाभरणी कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये, गांधीजींची काठी तुटली. आजपर्यंत ती तुटलेली काठी ग्रंथालयामध्ये जतन करून ठेवण्यात आली आहे.
सारस्वत निकेतन ग्रंथालय
अमरावती- स्वातंत्र्य लढ्यादरम्यान महात्मा गांधींनी देशभर भ्रमण केले. दक्षिणेकडे जेव्हा स्वतंत्रता आंदोलन जोर धरत होते, तेव्हा 'चिराला-पिराला' आंदोलनाच्या निमित्ताने गांधीजींनी आंध्र प्रदेशला भेट दिली. दुग्गीराला गोपालकृष्णय्या, ज्यांना 'आंध्र रत्न' म्हणून देखील ओळखले जाते; त्यांनी या चिराला-पिराला आंदोलनाचे नेतृत्व केले होते.