वर्धा - 'सेवाग्राम' आश्रम हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. येथे असलेली बापूंची 'कुटी' पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक सेवाग्रामला भेट देतात.
गांधी १५० : बापूंचे 'सेवाग्राम' ठरते आहे पर्यटनाचे केंद्र! 'खेड्याकडे चला' असा संदेश देत, महात्मा गांधी स्वतःदेखील १९३५ साली सेवाग्राम आश्रमात रहायला गेले. बापू तिथे आठ वर्षे राहिले. तिथे राहत असताना ते नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असत. यात बहुतेक करून स्वच्छतेचे काम असत.आपल्याला राहण्यासाठी साधीशी कुटी हवी आहे, जी केवळ १०० रुपयांमध्ये बांधून होईल आणि गावातील कामगारांकडून बांधली जाईल अशा अटी गांधीजींनी येथे आल्यावर ठेवल्या होत्या. गावातील लोकांना काम मिळावे, आणि साध्या राहणीचे महत्त्व लोकांना लक्षात यावे यासाठी गांधीजींनी या अटी ठेवल्या होत्या. या आश्रमात गांधीजींनी वापरलेल्या बऱ्याच गोष्टी जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये बापूंची काठी, पेपरवेट, दातांची कवळी, त्यांनी वापरलेले मेज इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.गांधीजींच्या जीवनपद्धतीची माहिती पुढच्या पिढीला मिळावी, यासाठी सेवाग्राम प्रयत्नशील आहे.हेही पहा : गांधी १५० : गांधीजींचे मुंबईतील निवासस्थान - मणि भवन!