महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गांधी १५० : गांधीजींचे मुंबईतील निवासस्थान - मणि भवन! - गोपाळ कृष्ण गोखले

१९१५ मध्ये महात्मा गांधी भारतात परतले, आणि त्यांनी भारतातच राहून लोकांची सेवा करण्याचे ठरवले. गुरु गोपाळकृष्ण गोखले यांनी गांधीजींना येथील सामान्य नागरिकाचे जीवन कसे आहे हे दाखवून दिले. ते पाहिल्यानंतर गांधीजींनी जवळपास देशभर भ्रमण केले. परत आल्यानंतर, १९१७ ते १९३४ पर्यंत ते मणि भवनमध्ये राहिले.

मणि भवन

By

Published : Sep 27, 2019, 5:04 AM IST

मुंबई - अमेरिकेच्या काही भागांतील लोकांना न्याय मिळवून देणारे मार्टिन ल्यूथर किंग, हे १९५९ मध्ये मुंबईच्या 'मणि भवन' मध्ये राहिले होते. भारत भेटीवर आलेल्या मार्टिन ल्यूथर यांच्या राहण्यासाठी आलीशान हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. मात्र त्याऐवजी त्यांनी मणि भवन मध्ये राहणे पसंत केले. तेथे गेल्यानंतर त्यांना महात्मा गांधी यांच्याबद्दल समजले. त्यानतंर ५० वर्षांनी, २००१ साली, त्यांचे पुत्र मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर यांनीदेखील आपल्या पत्नीसह मणि भवनला भेट दिली.

गांधी १५० : गांधीजींचे मुंबईतील निवासस्थान - मणि भवन!
मणि भवनचे सेक्रेटरी आणि ट्रस्टी मेघश्याम आजगांवकर यांनी सांगितले, की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा जेव्हा भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांनीदेखील मणि भवनला भेट दिली होती.मणी भवनच्या दुसऱ्या मजल्यावर महात्मा गांधी राहत होते. त्यामुळे, ही ऐतिहासिक जागा पाहण्यासाठी, दरवर्षी लाखो लोक मणि भवनला भेट देतात. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या महात्मा गांधींच्या खोलीशेजारीच आता एक संग्रहालय आहे. गांधीजींच्या खोलीमध्ये त्यांनी वापरलेला टेलीफोन अजूनही आहे. तसेच, त्यांनी वाचलेली पुस्तकेदेखील मणि भवनने जतन करुन ठेवली आहेत. १९१२ मध्ये रेवा शंकर झवेरी यांनी 'मणि भवन' उभारले. १९१५ मध्ये महात्मा गांधी भारतात परतले, आणि त्यांनी भारतातच राहून लोकांची सेवा करण्याचे ठरवले. गुरु गोपाळकृष्ण गोखले यांनी गांधीजींना इथल्या सामान्य नागरिकाचे जीवन कसे आहे हे दाखवून दिले. ते पाहिल्यानंतर गांधीजींनी जवळपास देशभर भ्रमण केले. परत आल्यानंतर, १९१७ ते १९३४ पर्यंत ते मणि भवनमध्ये राहिले.महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेचा संदेश जगाला दिला. भारताला सध्या गांधीजींची खूप गरज आहे. त्यांच्या विचारांना अंमलात आणणे हीच महात्मा गांधींना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही आजगांवकर म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details