रांची - स्वातंत्र्यसंग्रामादरम्यान, १८ सप्टेंबर १९२५ला गांधीजींनी हजारीबाग शहराला भेट दिली होती. तेव्हा त्यांनी सेंट कोलंबस महाविद्यालयातील विटले सभागृहात भाषण केले होते. या भाषणामध्ये त्यांनी साक्षरता, अस्पृश्यता, विधवा पुनर्विवाह अशा बऱ्याच मुद्यांना हात घातला होता.
गांधी १५० : स्वातंत्र्यसंग्रामामध्ये हजारीबागचे योगदान - रामनारायण सिंह
झारखंडमधील हजारीबाग शहर हे तिथल्या अभयारण्यांसाठी तर प्रसिद्ध आहेच. मात्र या शहराला ऐतिहासिक वारसा देखील लाभला आहे. जाणून घेऊया स्वातंत्र्यसंग्रामामध्ये हजारीबागचे काय योगदान होते...
हेही पहा : मंडला : जिथे बापूंनी अस्पृश्यतेविरूद्ध उभारले होते मोठे आंदोलन
हजारीबागमधील प्रसिद्ध स्वातंत्र्य योद्धे रामनारायण सिंह हे गांधीजींच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. गांधीजी आणि रामनारायण यांच्यात नेहमी पत्रव्यवहार होत असे. ज्यामध्ये ते सामाजिक बाबी आणि स्वातंत्र्यलढ्याबाबत चर्चा करत. रामनारायण यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर, गांधीजींनी पत्र लिहून त्यांचे सांत्वन केले होते.
महात्मा गांधींच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी हजारीबागला देखील आणल्या होत्या. हजारीबागच्या कुमार टोलीमध्ये त्यांच्या अस्थी ठेवण्यात आल्या होत्या. जिथे मोठ्या प्रमाणावर लोकांनी गांधीजींना श्रद्धांजली वाहिली.
नंतर, याठिकाणी गांधीजींचे स्मारक देखील उभारण्यात आले. दरवर्षी येथे गांधीजींची जयंती आणि पुण्यतिथीला विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.