हैदराबाद - पूर्व लडाख भागातील गलवान परिसरात भारत चीनमधील सैनिकांच्या हाणामारीत तीन भारतीय जवानांना वीरमरण आले. चीनचेही सैनिक मारले गेल्याचे भारताने अधिकृतरित्या सांगितले आहे. मात्र, चीनने याबाबत माहिती उघड केली नाही. दरम्यान, चिनी लष्कराच्या जीवितहानाची माहिती देणाऱ्या चिनी पत्रकाराने युटर्न घेत आपले वक्तव्य बदलले आहे.
चीनी सरकारच्या मालकीच्या ग्लोबल टाईम्स वृत्तपत्रातील वँग वेनवेन या पत्रकार महिलेने किती चीनी सैनिक मारले गेले याची माहिती ट्विटरवरून दिली होती. मात्र, नंतर आपले वक्तव्य बदलत ही माहिती भारतीय माध्यमांचा आधार घेत दिल्याचे स्पष्ट केले आहे.
5 सैनिक मारले गेले अन् 11 जखमी असल्याचे केले ट्विट
पिपल्स लिबरेशन आर्मीचे 5 जवान मारले गेले असून 11 जण जखमी झाल्याचे ट्विट वेनवेने हिने केले होते. मात्र, थोड्याच वेळात तिने आपले वक्तव्य फिरवले. या माहितीचा स्त्रोत दिला नसून आधीच्या एका ट्विटनुसार भारतीय जवानांनी उपसवल्यामुळे वाद सुरु झाल्याचे चीनी लष्कराने म्हटल्याचे ट्विट तिने पोस्ट केले केले.
भारताने सीमेवर वादासंबधीचे अधिकृत वक्तव्य काही वेळातच बदलले होते. तीन जवानांचा मृत्यू झाल्याचे मान्य करत चीनचेही सैनिक मारले गेल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट केले. सोमवारी रात्री ही हाणामारी झाली.
चीन आकडेवारी जाहीर करणार नाही कारण....
भारताने तीन सैनिकांचा मृत्यू झाल्याचे मान्य केले आहे. मात्र, चीनने आकडेवारी जाहीर केली नाही. दोन्ही सैन्यांमधील तुलना आणि भावनिक वातावरण पसरू नये म्हणून चीनने आकडेवारी जाहीर करण्याचे टाळले, असे चीनी सरकारच्या मालकीच्या ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राने संपादकीय लेखात म्हटले आहे. भारताने चीनच्या संयमाला कमकुतपणा समजू नये असा इशाराही अग्रलेखातून दिला आहे.