महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भीलवाडा जिल्ह्यातील गोडोलिया आणि बागरिया समाजावर उपासमारीची वेळ - गाडोलिया और बागरिया समाज

भीलवाडा जिल्ह्यात कोरोनाची साखळी संपवण्यासाठी संचाबंदी सुरू आहे. मात्र, या संचा बंदीच्या काळात गोडोलिया समाज आणि बागरिया समाजासमोर उपासमारीची वेळ आली आहे.

भीलवडा जिल्ह्यातील गोडोलिया आणि बागरिया समाजावर उपासमारीची वेळ

By

Published : Apr 10, 2020, 9:07 PM IST

भीलवाडा - जिल्ह्यात कोरोनाची साखळी संपवण्यासाठी शहरात संचारबंदी सुरू आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे मजुरी करणाऱ्या लोकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 'ईटीव्ही भारत'च्या टीमने भीलवाडाच्या एन एच 79 वरील बेरा गावातील गोडोलिया समाज आणि बागरिया समाजाच्या परस्थितीचा आढावा घेतला. जिल्हा प्रशासनाने त्यांना जेवण बनवण्यासाठी एका वेळचे रेशन दिले आहे. मात्र, रेशन संपत आल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

भीलवडा जिल्ह्यातील गोडोलिया आणि बागरिया समाजावर उपासमारीची वेळ

जिल्ह्यात 20 मार्चपासून संचारबंदी सुरू आहे, तर ग्रामीण भागात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे ग्रामीण क्षेत्रात दररोज काम करणारा समाज आणि बागरिया समाजाला समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

गाडोलिया आणि बागरिया समाजाचे लोक लोखंडी हत्यारे आणि झाडू बनवतात. हाच त्यांच्या उत्पन्नाचा भाग आहे. या वस्तू विकून ते आपली दोन वेळची भूक भागवतात. लोक ही हत्यार आणि झाडू विकण्यासाठी दुसऱ्या गावात आणि शहरात जातात. मात्र, शहरात लॉकडाऊन असल्यामुळे हे साहित्य विकले जात नाही आहे. यामुळे त्यांच्या समोर दोनवेळच्या अन्नाचा प्रश्न ऊभा राहीला आहे.

जिल्हा प्रशासनाने त्यांना एक वेळचे रेशन उपलब्ध करून दिले होते. मात्र, ते रेशन सुद्धा संपत आले आहे. यामुळे या लोकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. आम्ही लॉकडाऊनचे पालन करत आहे. प्रशासनाने आम्हाला रेशन उपलब्ध करून द्यावे, असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details