महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदी, राहुल गांधींसह इतरांनी घेतले प्रणव मुखर्जींचे अंत्यदर्शन... - Funeral of Pranab Mukherjee

Funeral of former President Pranab Mukherjee to be held today
LIVE : प्रणव मुखर्जी यांचे पार्थिव निवासस्थानी दाखल, अंत्यदर्शन सुरू...

By

Published : Sep 1, 2020, 10:10 AM IST

Updated : Sep 1, 2020, 1:06 PM IST

11:20 September 01

भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रणवदांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले..

11:19 September 01

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी प्रणवदांना श्रद्धांजली वाहिली..

11:08 September 01

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रणव मुखर्जींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले..

11:07 September 01

काँग्रेस नेते राहुल गांधींनी प्रणव मुखर्जींना वाहिली श्रद्धांजली..

10:52 September 01

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रणव मुखर्जींना वाहिली श्रद्धांजली..

10:43 September 01

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रणव मुखर्जींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले..

10:43 September 01

भाजप पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रणव मुखर्जींना श्रद्धांजली वाहिली..

10:42 September 01

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, आणि सीपीआय प्रमुख डी. राजा यांनी प्रणव मुखर्जींना श्रद्धांजली वाहिली...

10:41 September 01

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी प्रणव मुखर्जींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले..

10:30 September 01

उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली...

10:16 September 01

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रणव मुखर्जींना श्रद्धांजली वाहिली...

10:03 September 01

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली..

10:02 September 01

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रणव मुखर्जींच्या निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले...

09:58 September 01

नवी दिल्ली :चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख एम. एम. नरावणे, हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया आणि नौदल प्रमुख अ‌ॅडमिरल करमबीर सिंग यांनी प्रवणदांना श्रद्धांजली वाहिली...

09:55 September 01

प्रणव मुखर्जी यांचे पार्थिव निवासस्थानी दाखल, अंत्यदर्शन सुरू...

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे काल निधन झाले. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी दिल्लीमधील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुखर्जींना गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. सोमवारी सकाळी रुग्णालयाने फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये गेले असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते 84 वर्षांचे होते. त्यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

Last Updated : Sep 1, 2020, 1:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details