वॉशिंग्टन -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २४ आणि २५ फेब्रुवारीला भारतात असणार आहेत. त्यांच्या या भारत दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत अमेरिकेच्या प्रथम महिला मेलियाना ट्रम्पदेखील असणार आहेत. यावेळी ते भारतात विविध ठिकाणी भेट देतील. तसेच, अमेरिकेच्या दूतावासामध्ये एका बैठकीलाही ते उपस्थित राहतील.
त्यांच्या या दौऱ्याची संपूर्ण रूपरेषा पुढीलप्रमाणे असणार आहे..
२४ फेब्रुवारी -
- डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेहून थेट अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होतील. यानंतर ते पंतप्रधान मोदींसह २२ किलोमीटर लांब असा रोड-शो करणार आहेत. यावेळी हजारो लोक रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभारून त्यांचे स्वागत करतील.
- यानंतर हे पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प हे मोतेरा स्टेडियमवर होत असलेल्या 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमात सहभागी होतील.
- त्यानंतर, ट्रम्प आणि मोदी हे साबरमती आश्रमाला भेट देतील. साधारणपणे ३० मिनिटे ते तिथे असणार आहेत. यादरम्यान ट्रम्प यांना महात्मा गांधींच्या आयुष्यावर आधारित पुस्तक आणि चरख्याची एक प्रतिकृती भेट म्हणून देण्यात येईल.
- यानंतर त्याच दिवशी ते आग्र्याला रवाना होतील.