नवी दिल्ली -सलग सहाव्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 57 पैसे तर डिझेलच्या किंमतीमध्ये प्रतिलिटर 59 पैसे वाढ झाली आहे. तब्बल 83 दिवसांनंतर रविवारी प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. दरम्यान गुरुवारी हा दर पेट्रोलसाठी 74 तर डिझेलचा 72.22 रुपये इतका होता.
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सलग सहाव्या दिवशी वाढ; पेट्रोल 57, तर डिझेल 59 पैशांनी महागले - petrol price news
सलग सहाव्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 57 पैसे तर डिझेलच्या किंमतीमध्ये प्रतिलिटर 59 पैसे वाढ झाली आहे.
दिल्लीत प्रतिलिटर पेट्रोलसाठी 74.57 रुपये मोजावे लागलणार आहेत. तर डिझेलचा दर 72.81 रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे. राज्य सरकारांनी विक्रीकर आणि इतर कर पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर लावल्यामुळे संपूर्ण देशात इंधन दरात वाढ झाली आहे. गेल्या 6 दिवसांत पेट्रोलमध्ये 3.31 रुपये आणि डिझेलमध्ये 3.42 रुपये प्रतिलिटर एवढी दरवाढ झाली आहे.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर लोकांचे जीवन थोड्याप्रमाणात रुळावर येत असल्याने पेट्रोल-डिझेलच्या मागणीत वाढ होत आहे. येत्या काही दिवसात जनतेला कोरोनासह महागाईचा चटका सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.