पटना -हैदराबादमधील महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्येची घटना ताजी असतानाच बिहारमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. बक्सरमधील कुकुडा गावात एका तरूणीचा गोळी मारण्यात आलेला मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला आहे. मारण्यापूर्वी मुलीवर शारीरिक अत्याचार झाल्याची शंका वर्तवली जात आहे.
बक्सरमध्ये तरूणीला डोक्यात गोळी मारून जाळले मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या घरच्यांनी पोलिसात दाखल केली होती. एका अज्ञात नंबरवरून मुलीच्या घरच्यांना 'आता मुलगी परत घरी येणार नाही' अशी माहिती देणारा फोन आल्याचेही सांगण्यात आले आहे.
हेही वाचा -नांदेडमध्ये स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा
दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. अत्याचार झाले आहेत की नाही हे स्पष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तीन वेळा पोस्टमार्टम करण्यात आले आहे. रिपोर्ट आल्यानंतर पुढच्या तपासाला वेग मिळणार आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एफएसएलची चार सदस्यीय टीम बक्सरमध्ये दाखल झाली आहे. पुरावे मिळवण्यासाठी श्वानपथकाचीही मदत घेतली जात आहे.