महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी... वाचा एका क्लिकवर - कोरोना अपडेट इंडिया

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अ‌ॅक्टीव रुग्णसंख्येतील 60 टक्के रुग्ण हे सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या पहिल्या पाच राज्यांमध्ये आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 84,372 इतकी झाली आहे.

कोरोना
कोरोना

By

Published : Sep 19, 2020, 3:43 AM IST

नवी दिल्ली - कोरोना रुग्णसंख्येने देशात शुक्रवारी 52 लाखांचा टप्पा ओलांडला. 96,424 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 1,174 रुग्णांचा गेल्या 24 तासात मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 52,14,677 वर पोहचला आहे. यामध्ये 10,17,754 सक्रिय रुग्ण असून आत्तापर्यंत 41,12,552 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 84,372 इतकी झाली आहे.

अ‌ॅक्टीव रुग्णसंख्येतील 60 टक्के रुग्ण हे सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या पहिल्या पाच राज्यांमध्ये आहेत. 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 5 हजार पेक्षा कमी सक्रिय रुग्ण असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

कोरोना आकडेवारी
  • दिल्ली-

राजधानी दिल्लीत नव्याने 4,432 कोरोनाबाधित रुग्ण समोर आले असून एकणू बाधितांचा 2,34,701 वर पोहचला आहे. आज 38 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून गेल्या ६० दिवसांमध्ये एका दिवसात झालेल्या मृत्यूंमध्ये हे मृत्यू आहेत. एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या 4,877 ऐवढी झाली आहे. 1,98,103 इतके रुग्ण आत्तापर्यंत कोरोनातून बरे झाले असून राज्यात 31,721 अ‌ॅक्टीव रुग्णसंख्या आहे.

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सर्व शाळा-महाविद्यालये 5 ऑक्टोंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारकडून निर्गमित करण्यात आले आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यास काही हरकत नसल्याचे सांगितले आहे.

  • उत्तराखंड-

उत्तराखंडमध्ये बाहेरून येणार्‍या लोकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. फक्त ३ ते ४ दिवसांसाठी राज्यात येणार्‍या प्रवाशांसाठी कोरोना चाचणी करणे अनिवार्य नाही. यापूर्वी राज्य सरकारने उत्तराखंडमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने चाचणी करून येणे आणि निगेटिव्ह असणे बंधनकारक केले होते.

  • मध्य प्रदेश -

मध्य प्रदेशचे आरोग्यमंत्री ईदलसिंग कंसाना यांची कोरोना व्हायरससाठीची चाचणी पॉझिटिव्हा आली आहे. कंसाना यांनी स्वत: याबाबत माहिती दिली. मंदसौरचे आणखी एक भाजप आमदार यशपालसिंग सिसोदिया यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना रितूवान रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. इतरही काही राजकीय नेत्यांशी संबंधित नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

  • उत्तर प्रदेश -

येथील पिलिभीत तरुंगातील 105 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 802 कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात सध्या 946 कैदी शिक्षा भोगत आहेत. जिल्हा आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तरुंगात जावून सर्व कैद्यांची चाचणी केली होती, त्यामध्ये १०५ कैदी पॉझिटिव्ह सापडले आहेत.

  • जम्मू-काश्मीर -

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २४ तासात 1,330 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याबरोबर केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 966 एवढी झाली आहे.

  • पश्चिम बंगाल -

कोलकात्याच्या पोलीस उपायुक्तांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यात आत्तापर्यंत 3 हजाराहून अधिक पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

  • गुजरात-

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांची कोरोना विषाणू चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. गुरुवारी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. 92 वर्षीय केशुभाई सध्या गृह अलगीकरणात उपचार घेत असल्याचे त्यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा -राज्यात दिवसभरात २१ हजार ६५६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४०५ मृत्यू

हेही वाचा -नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाला कोरोनाचा विळखा; जिल्हाधिकाऱ्यांसह ५० कर्मचाऱ्यांना लागण

ABOUT THE AUTHOR

...view details