कुल्लू - हिमाचल प्रदेशमधील लाहौल स्पीती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे कुलुला जोडणारा रोहतांग मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आाला आहे. सातत्याने सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे घाटीत राहणाऱ्या लोकांच्या चिंतेत वाढ झााली आहे.
हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे रोहतांग मार्ग बंद
हिमाचल प्रदेशमधील लाहौल स्पीती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे कुल्लूला जोडणारा रोहतांग मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाहौल स्पीती जिल्ह्यातील कोकसर आणि मढी परिसरासह अन्य परीसरात सातत्याने बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे त्या परिसरातील लाकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बीआरओच्या टीमने सुरुवातील रस्त्यांवरील बर्फ हटवून ये-जा करण्यासाठी माग्र मोकळा केला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा बर्फवृष्टी झाल्याने रोहतांग मार्ग मार्ग बंद झाला आहे. हवामान खात्यांच्या अंदाजानुसार आणखी 3 दिवस वातावरण असेच राहिल. त्यामुळे या परिसारातील सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे.