गुवाहाटी :आसामला जवळपास महिनाभरानंतर पुन्हा एकदा पुराचा फटका बसला आहे. चार जिल्ह्यांमधील ३४ हजार लोक पूरबाधित आहेत, तर आतापर्यंत एकाचा मृत्यूही झाला असल्याची माहिती आसामच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
धेमाजी, लख्मीपूर, बिसवनाथ आणि चिरंग या चार जिल्ह्यामधील सुमारे ३४ हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ४,२०० हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आसाममध्ये पुरामुळे ११३ लोकांचा जीव गेला होता. तर मे महिन्यापासून झालेल्या भूस्खलनांच्या घटनांमध्ये आतापर्यंत २६ जणांचा बळी गेला आहे.