श्रीनगर - कलम ३७० हटवण्याच्या प्रक्रियेदरम्यान काश्मीरमध्ये तणावपूर्ण वातावरण होते. या पार्श्वभूमीवर, काश्मीरमधील इंटरनेट, फोन सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अजूनही बऱ्याच ठिकाणी फोन सेवा बंद आहेत. हे लक्षात घेऊन एका महिलेने आपल्या घरी मोफत दूरध्वनी सेवा केंद्र सुरु केले आहे. या सेवेच्या मदतीने परिसरातील लोक आपल्या परिजनांशी संपर्क साधत आहेत.
काश्मीरमध्ये महिलेने घरीच सुरु केले मोफत दूरध्वनी सेवा केंद्र - काश्मीरमधील इंटरनेट, फोन सेवा बंद
या महिलेच्या घरचा दूरध्वनी सुरु झाल्यानंतर, जेव्हा तिच्या लक्षात आले की बाकी घरची दूरध्वनी किंवा मोबाईल सेवा अजूनही बंद आहे, तिने आसपासच्या लोकांना आपला दूरध्वनी वापरण्याची परवानगी दिली. त्यानंतर, तिच्या लक्षात आले की बऱ्याच लोकांना याची गरज आहे. त्यामुळे तिने आपल्या परिसरात दूरध्वनीबद्दलची माहिती पसरवण्यास सांगितली.
या महिलेच्या घरचा दूरध्वनी सुरु झाल्यानंतर, जेव्हा तिच्या लक्षात आले की बाकी घरची दूरध्वनी किंवा मोबाईल सेवा अजूनही बंद आहे, तिने आसपासच्या लोकांना आपला दूरध्वनी वापरण्याची परवानगी दिली. त्यानंतर, तिच्या लक्षात आले की बऱ्याच लोकांना याची गरज आहे. त्यामुळे तिने आपल्या परिसरात दूरध्वनीबद्दलची माहिती पसरवण्यास सांगितली. आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना देखील हा दूरध्वनी उपलबद्ध करून दिला.
लोकांची अडचण लक्षात घेऊन त्यांनी ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली. त्यानंतर एका हितचिंतकाच्या सांगण्यावरून त्यांनी दूरध्वनीशेजारी 'चॅरिटी बॉक्स' ठेवला. ज्यामध्ये लोक आता आपल्या इच्छेनुसार पैसे टाकून जातात.