नवी दिल्ली - कोरोना संकटामुळे सर्वांपुढे आव्हान निर्माण झाले असतानाही राफेल विमानांचा भारताला वेळेत पुरवठा करण्यास फ्रान्स कटिबद्ध आहे, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. फ्रान्सचे आर्मड फोर्सस मंत्री फ्लॉरेन्स पार्ले यांच्याशी सिंह यांनी फोनवर चर्चा केल्यानंतर ही माहिती दिली.
कोरोना संकटातही फ्रान्स राफेल विमानांचा वेळेत पुरवठा करणार - राजनाथ सिंह राफेल
दोन्ही नेत्यांनी कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि प्रादेशिक सुरक्षा यासह द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केली. संरक्षण क्षेत्रात दोन्ही देशांचे संबध मजबूत करण्यासाबाबत सहमती झाल्याचे राजनाथ सिंह यांनी ट्विटरवरून सांगितले.

'कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्कराने केलेल्या कामाचं मी कौतुक करतो. कोरोना संकट उभे राहीले असतानाही फ्रान्स राफेल विमानांचा वेळेत पुरवठा करण्यास कटिबद्ध आहे, असे सिंह यांनी ट्विटरवर म्हटले आहे. यावर्षी जुलैच्या शेवटी पहिली चार राफेल विमाने भारतात दाखल होणार आहेत. मे महिन्यातच विमानांची डिलिवरी भारताला मिळणार होती. मात्र, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत दोन्ही देशांनी हे योजना पुढे ढकलली होती.