महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लॉकडाऊन वाढल्याने चंदीगडवरून ४ तरुणांची गावापर्यंत सायकलस्वारी - Motihari

कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करण्याऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वजण आपल्या गावी धाव घेत आहेत.

लॉक डाउन  corona virus  lock down  मोतिहारी  क्वारंटाइन सेंटर  Chandigarh  Four youths reached Motihari  Motihari  reached Motihari by cycling
लॉकडाऊन वाढल्याने चंदीगडवरून ४ तरुणांची गावापर्यंत सायकलस्वारी

By

Published : Apr 17, 2020, 4:00 PM IST

मोतिहारी - कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करण्याऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वजण आपल्या गावी धाव घेत आहेत. चंदीगड येथे काम करणारे ४ तरुण सायकलने मोतिहारी येथील आपल्या गावी पोहोचले. त्यानंतर त्यांची थर्मल स्क्रिनिंग करून त्यांना क्वारंनटाईनमध्ये पाठवण्यात आले.

लॉकडाऊन वाढल्याने चंदीगडवरून ४ तरुणांची गावापर्यंत सायकलस्वारी

सात दिवस सायकल चालवून चंदीगड ते मोतिहारी प्रवास केला. मात्र, सतत सायकल चालवणे शक्य नव्हते. त्यामुळे एका तासात काही ५-७ मिनिटे थांबून आराम करत होतो. तसेच रात्री २ ते ३ तास पेट्रोल पंप किंवा बंद दुकानांच्या पायऱ्यांवर झोप घेत होतो. तसेच ठिकठिकाणी अनेकजण अन्नदान करत होते. त्यामुळे उपासमारीची वेळ आली नाही. अशारितीने मोतिहारी पोहोचल्याचे त्या तरुणांनी सांगितले.

स्थानिक अधिकाऱ्यांना बाहेरून ४ तरुण आल्याची माहिती मिळताच त्यांना त्या तरुणांचे थर्मल स्क्रिनिंग केले. मात्र, त्यांच्यामध्य कोरोनाचे लक्षणे आढळून आले नाही. त्यानंतर त्यांना एका शाळेत बनवलेल्या क्वारंनटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आले. यामधील काही तरुण महुआवा गावचे, तर एक पिपरा गावचा रहिवासी असल्याचे प्रशासनाने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details