महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पुलवामात चकमक, चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास सुरक्षा दलाच्या जवानांना यश

जवानांच्या ताफ्यावर केलेल्या भ्याड हल्ल्यात याच पुलवामा जिल्ह्यात ४२ जवानांना वीरमरण आले होते. काही दिवासांपासून काश्मीरमध्ये दहशतवादी चळवळींनी पुन्हा जोर धरला आहे.

४ दहशतवादी ठार

By

Published : Jun 7, 2019, 8:50 AM IST

Updated : Jun 7, 2019, 10:02 AM IST

पुलवामा- जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लस्सीपोरा परिसरात आज पहाटेच सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. आतपर्यंत या चकमकीत ४ दहशवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे.

सुरक्षा दलाच्या जवानांनी या परिसराला वेढा दिला असून दहशतवाद्यांकडून ३ एके ४७ रायफल हस्तगत करण्यात आल्या आहे. मारले गलेले चारही दहशतवादी जैश-ए- मोहम्मद या दहशतदवादी संघटनेचे सदस्य आहेत. या परिसरात जोरदार शोधमोहीम सुरू करण्यात आली असून प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी गृहखात्याने दहा सर्वाधीक विध्वसंक दहशतद्यांची यादी जाहीर केली आहे. त्यासाठी लष्कराने मोहीम हाती घेतली आहे.

Last Updated : Jun 7, 2019, 10:02 AM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details