तेजपूर- आसामच्या बिश्वनाथ जिल्ह्यात 3 परिचारिकांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली 4 जणांना अटक करण्यात आली आहे. या 3 परिचारिका लखीमपूरच्या असून त्या बिश्वनाथ जिल्ह्यातील रूग्णालयात कार्यरत आहेत.
आसाममध्ये तीन परिचारिकांचा विनयभंगप्रकरणी 4 जणांना अटक - आसाम गुन्हे बातमी
रविवारी आसाममध्ये 3 परिचारिकांचा विनयभंग केल्याप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे.
परिचारिकांचा विनयभंग केल्याप्रकरणी 4 जणांना अटक
शनिवारी रात्री या परिचारिका रुग्णालयात कर्तव्यावर जात असताना डगाव येथील पेट्रोल पंपासमोर या तिघींचा विनयभंग केल्याचे समोर आले याहे. यावेळी नागरिकांनी एका आरोपीला पोलिसांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. तर अन्य तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले.
त्यानंतर रविवारी सकाळी पोलिसांनी पळून गेलेल्या 3 आरोपींना अटक केली. या चौघांविरूद्ध बिश्वनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.