महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

स्कॉर्पिओची ट्रकला धडक, ४ जण जिंवत जळाले, ३ गंभीर - कडपा येथील अपघातात चार जण जळाले न्यूज

उपनगरातील विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातात चार जण जिंवत जळाले आहेत. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे.

Four people were burnt alive in a road accident in Kadapa
स्कॉर्पिओची टिप्परच्या डिझेल टॅकला धडक, ४ जण जिंवत जळाले, ३ गंभीर

By

Published : Nov 2, 2020, 7:51 AM IST

Updated : Nov 2, 2020, 8:58 AM IST

कडपा (आंध्र प्रदेश) - उपनगरातील विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातात चार जण जिंवत जळाले आहेत. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना उपचासारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दोन कारसह एक ट्रक जळून खाक झाला आहे.

स्कॉर्पिओची ट्रकला धडक, ४ जण जिंवत जळाले, ३ गंभीर

चार जण जिवंत जळाले

मिळालेल्या माहितीनुसार, एका स्कॉर्पिओमध्ये चार जण चंदनाच्या लाकडाची तस्करी करत होते. ते भरधाव वेगाने निघाले असता, त्यांनी समोर येणाऱ्या ट्रकला धडक दिली. ही धडक ट्रकच्या डिझेल टॅकला बसल्याने, ट्रकने पेट घेतला. त्याचवेळी स्कॉर्पिओमध्ये चंदनाची लाकडे असल्याने आग भडकली. त्याच वेळी एक कार त्याच ट्रकला येवून धडकली. या अपघातात स्कॉर्पिओमधील चार जण जिंवत जळाले.

जखमी रूग्णालयात दाखल

कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दोन कार आणि एक ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेत, आग नियत्रंणात आणली. दरम्यान, स्कॉर्पिओ कार तामिळनाडूमधून आल्याची माहिती मिळत आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

30 ऑक्टोबरलाही झाला होता मोठा अपघात

आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात लग्नाचे बिऱ्हाड घेवून जाणाऱ्या व्हॅनला शुक्रवारी भीषण अपघात झाला होता. या अपघातात सात जण जागीच ठार झाले होते. लग्नाचे वऱ्हाड परत येताना पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला होता. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील तांतिकोंडा घाट रोडवरील व्यंकटेश्वरस्वामी मंदिराजवळ ही दुर्घटना घडली होती.

हेही वाचा -दोन्ही राजकुमारांना हवा विनाश, केंद्रीय मंत्री अश्विनी चौबेंची राहुल, तेजस्वीवर अप्रत्यक्ष टीका

हेही वाचा -उत्तर प्रदेशात भीषण अपघात; 6 जण जागीच ठार, 10 पेक्षा अधिक जखमी

Last Updated : Nov 2, 2020, 8:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details