रायचूर (कर्नाटक) -कर्नाटकातील रायचूर येथे एकाच कुटुंबातील चार सदस्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाहाने नाराज झालेल्या मुलीच्या परिवारातील लोकांनी मुलाच्या परिवारातील चार जणांची निघृण हत्या केली आहे. हत्या झालेल्या चौघांमध्ये दोन स्त्रिया आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
सावितराम, श्रीदेवी, हनुमेश आणि नागराज अशी मृतांची नावे आहेत. घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांसोबत बातचीत केली असता त्यांनी, प्रेमविवाहाच्या नाराजीतून ही घटना घडल्याचे सांगितले.
प्रेमविवाह प्रकरणातून कर्नाटकात एकाच कुटुंबातील चौघांची निघृण हत्या... हेही वाचा...राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'त्या' पदाधिकाऱ्याच्या खुनाचा अवघ्या 24 तासात छडा; 5 आरोपी अटकेत
रायचूर जिल्ह्यातील सिंधानूरू भागात ही घटना घडली आहे. मौनेश आणि मंजुला यांचा दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर ते कुटुंबापासून स्वतंत्र राहत होते. त्याच्या काही दिवसानंतर मौनेश आणि मंजुला, दोघेही मंजुलाच्या पालकांना भेटायला गेले होते. तेव्हाच मंजुलाच्या कुटुंबीयांनी मौनेशला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर दोघांनाही तेथीन बाहेर पडल्यावर पोलिसांत याबाबत तक्रार करण्याचे ठरवले होते. याची भनक मंजुलाच्या कुटुंबीयांना लागली. त्यांनी सिंधानूरू येथील मौनेशचे घर गाठले. त्यावेळी त्याच्या घरात असलेल्या मौनेशच्या पालकांवर हल्ला चढवला.
यात सावितराम, श्रीदेवी, हनुमेश आणि नागराज यांचा जागीच मृत्यू झाला. तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी मारेकरींना ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे. परंतु, या घटनेनंतर सिंधानूरू शहरातील नागरिक भयभीत झाले आहे.