महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजस्थानच्या नागौैर जिल्ह्यात झालेल्या अपघातात चौघांचा जळून मृत्यू - नागौर अपघात न्यूज

किशनगड-हनुमानगड मेगा हायवेवर बाकलिया गावाजवळ झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात झाल्याचे समजताच लाडनू पोलीस ठाणे व डीडवाना पोलीस ठाण्याचे अधिकारी गणेशराम आणि सहाय्यक पोलीस अधिक्षक संजय गुप्ता यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Nagaur Road Accident
नागौर अपघात

By

Published : Jul 15, 2020, 11:59 AM IST

जयपूर(नागौर) -लाडनू-डीडवाना दरम्यान असलेल्या बाकलिया गावाजवळ झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. डंपर आणि ट्रेलरची धडक झाल्याने आग लागली. या आगीत दोघांचा जागीच मृत्यू झाला तर आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एकाला जयपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे.

किशनगड-हनुमानगड मेगा हायवेवर बाकलिया गावाजवळ भीषण अपघात झाल्याचे समजताच लाडनू पोलीस ठाणे व डीडवाना पोलीस ठाण्याचे अधिकारी गणेशराम आणि सहाय्यक पोलीस अधिक्षक संजय गुप्ता यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनांच्या जोरदार धडकेनंतर लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. आग आटोक्यात आल्यानंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली गेली. मात्र, तोपर्यंत रस्त्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.

डंपर आणि ट्रेलरची धडक झाल्याने आग लागली

अपघात झालेल्या डंपरमध्ये बाजरी भरलेली होती तर ट्रेलरमध्ये गहू भरलेला होता. एक वाहन अजमेरवरून आले होते व दुसरे वाहन गंगानगरवरून आले होते. आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह जळाल्याने त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details